आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर कर्तव्यावर परतले मोदी; 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा

आईच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवत अंत्यविधींनंतर कर्तव्यावर परतले मोदी; 'वंदे भारत'ला दाखवला हिरवा झेंडा

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. हिराबेन मोदी यांच्यावर काही दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले.

आज सकाळी साडेनऊ वाजता हिराबेन मोदी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये मोदींनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं चित्र पहायला मिळालं. आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दोनच तासांमध्ये मोदींकडून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आज पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम बंगालमधील हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. हावडा येथील कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर नेते उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, बंगालच्या पवित्र भूमीला सलाम. वैयक्तिक कारणांमुळे मी तुमच्यामध्ये येऊ शकलो नाही. याबद्दल मी माफी मागतो. रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. वंदे भारत ट्रेनसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन. काही काळानंतर गंगाजीची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याशी संबंधित प्रकल्प पश्चिम बंगालकडे सोपवण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमा दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली. “आदरणीय पंतप्रधान, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप दुःखाचा आणि खूप मोठे नुकसान आहे. मी देवाला प्रार्थना करतो, देव तुम्हाला शक्ती देवो. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही पश्चिम बंगालला येणार होता, पण तुमच्या आईच्या निधनामुळे तुम्ही येऊ शकला नाही, पण तरीही सामील झालात. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. आज मला माझ्या आईची आठवण येत आहे. कोणत्या शब्दात व्यक्त करावं तेच कळत नाही. तुमच्या आईच्या निधनाने खूप मोठी हानी झाली आहे, असं  ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com