लालकृष्ण अडवाणी यांनी आरोप फेटाळलेे
देश-विदेश

लालकृष्ण अडवाणी यांनी आरोप फेटाळलेे

बाबरी विध्वंस प्रकरण

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

लखनौ | Lucknow -

बाबरी विध्वंसप्रकरणी Babri demolition case विशेष सीबीआय न्यायालयाने Bureau of Investigation (CBI) court आज भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी Bharatiya Janata Party (BJP) leader Lal Krishna Advani यांची आभासी पद्धतीने साक्ष नोंदवली. यावेळी अडवाणी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले.

बाबरी विध्वंसात माझ्यावर जे काही आरोप ठेवण्यात आले आहेत, ते सर्व निराधार असून, राजकीय कटाचा एक भाग आहे. मी हे सर्व आरोप फेटाळत असल्याचे अडवाणी यांनी सांगितले.

दरम्यान, अडवाणी यांची आभासी साक्ष नोंदविण्यात आली असली, तरी यावेळी न्या. एस. के. यादव यांच्या न्यायालयात त्यांचे वकील विमलकुमार श्रीवास्ताव, के. के. मिश्रा आणि अभिषेक रंजन उपस्थित होते. सीबीआयचे वकील तिथे होते. गुरुवारी न्यायालयाने भाजपाचे अन्य एक ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचीही आभासी साक्ष नोंदवली होती. त्यांनीही आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Deshdoot
www.deshdoot.com