babri masjid demolition ; २५ वर्षानंतर लावले कटाचे कलम

पहिल्या एफआयआर शुक्ला यांचा
babri masjid
babri masjid

फैजाबाद येथील पोलिस ठाण्यात राम जन्मभूमीचे अशोक प्रियंवदा नाथ शुक्ला यांनी पहिला FIR दाखल केला होता. दुसरा FIR एसआय गंगा प्रसाद तिवारी यांनी दाखल केला.

दुसऱ्या FIR वरुन भाजप, विश्व हिंदू परिषद व इतर ४९ हिंदुत्ववादी नेत्यांवर खटला चालला. या प्रकरणात वेगवेगळ्या तारखांना ४७ पत्रकारांनी FIR दाखल केला.

५ ऑक्टोंबरला आरोपपत्र

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात पहिला आरोपपत्र ५ ऑक्टोंबर १९९३ रोजी ४९ आरोपींवर सीबीआयने दाखिल केले. यातील १३ आरोपींवर खटला रद्द केला गेला. अखेरी या १३ आरोपींविरोधातही सुप्रीम कोर्टाकडून खटला चालवण्याचा आदेश आला. १८ मे २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने यापैकी ६ समन्स पाठवले, कल्याण सिंह राजस्थानचे राज्यपाल होते. म्हणून त्यांना समन्स पाठवले गेले नाही, तर उर्वरित ६ जणांचा मृत्यू झाला होता.

२५ वर्षानंतर लावले कटाचे कलम

बाबरी विध्वंस प्रकरणात तब्बल २५ वर्ष आयपीसी कलम १२० म्हणजेच कट रचण्याचे कलम लावण्यात आले नव्हते. परंतु ३० मे २०१७ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा व विष्णु हरि डालमिया यांच्यावर आयपीसीचे कलम १२० लावण्याचे आदेश दिले. या सर्वांविरुद्ध आयपीसीच्या कलम १२० बी, १४७, १४९, १५३ए, १५३बी आणि ५०५ (१) अंतर्गत कारवाई करण्यात आली.विष्णू हरी डालमिया यांचे निधन झाले आहे. महंत नृत्य गोपाल दास, महंत राम विलास वेदांती, बैकुंठ लाल शर्मा ऊर्फ प्रेमजी, चंपत राय बंसल, धर्मदास आणि डॉ. सतीश प्रधान यांच्यावरही आयपीसीच्या कलम १४७, १४९, १५३ए, १५३बी, २९५,न २९५ए आणि ५०५ (१) सह कलम १२० बी अंतर्गत आरोप निश्चित झाले. कल्याण सिंह यांनी राज्यपालपद सोडल्यानंतर १७ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांच्यावरही वरील सर्व कलम लावण्यात आले होते. अशाप्रकारे ४९ पैकी एकूण ३२ आरोपींच्या खटल्याची सुनावणी सुरू झाली, उर्वरित १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने १ सप्टेंबर २०२० पर्यंत संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करत निर्णय लिहिण्यास सुरुवात केली आहे आणि आता ३० सप्टेंबर रोजी निर्णय येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com