नवी दिल्ली -

अयोध्येत उभारण्यात येणार्या भव्य राम मंदिराची प्रतिकृती 26 जानेवारी 2021 या दिवशी म्हणजेच

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राजपथावर पहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशकडून हा प्रतिमा रथ सादर करण्यात येणार आहे.

यूपीमधून यंदा अयोध्येचं सांस्कृतिक वैभव ही थीम ठरवण्यात आली आहे. यामध्ये अयोध्यात दरवर्षी साजरा होणारा दीपोत्सव दाखवण्यात येणार आहे. सोबतच शबरीची उष्टी बोरं, निषादराज राम मिलन, केवटला आशीर्वाद अशी दृश्य यामध्ये पाहायला मिळतील.

यूपी सरकार आपल्या या रथात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मृदंगाचार्य रामशंकरदास यांची मूर्ती देखील ठेवणार आहे.

यंदाच अयोध्येत ऑगस्टमध्ये राम मंदिराची पायाभरणी करण्यात आली. डिसेंबर महिन्यात याचे काम सुरू होणारआहे. जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राम मंदिराची प्रतिकृती होणार आहे.