भूकंपातही टिकाव धरेल राममंदिर
देश-विदेश

भूकंपातही टिकाव धरेल राममंदिर

एक हजार वर्षांचे आयुष्य, स्थापत्यकार चंद्रकांत सोमपुरा यांचा दावा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

अयोध्या |Ayodhya -

अयोध्येतील राममंदिर भव्य आणि अतिशय मजबूतही असेल. Ram Temple हे मंदिर 10 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का देखील सहन करू शकणार आहे. earthquake राममंदिराची मूळ वास्तू एक हजार वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणार असून, मंदिराच्या सौंदर्यावरही कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा या मंदिराचे स्थापत्यकार चंद्रकांत सोमपुरा यांनी केला आहे.

सोमपुरा हे मंदिर वास्तुविशारदांच्या कुटुंबातूनच आलेले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आतापर्यंत सुमारे 300 मंदिरांचे बांधकाम केले आहे.

राममंदिर स्थापत्यशास्त्रातील नागर शैलीत बांधले जाणार आहे. मंदिरात एका वेळेस 10 हजार भाविक सामावू शकतील, एवढे मोठे मंदिर असेल. उत्तरप्रदेश, गुजरात आणि राजस्थानातील सर्व प्राचीन मंदिरे अशाच प्रकारच्या वास्तुशास्त्रानुसार बांधली आहेत.

राममंदिर दोन एकरात बांधले जाणार आहे. उर्वरित 67 एकर जागेत विविध प्रकारची झाडे, वस्तुसंग्रहालय आणि इतर संबंधित इमारती असतील. मंदिरासाठी दगड तयार करणार्‍या कार्यशाळेचे पर्यवेक्षक अन्नुभाई सोमपुरा यांनीही, हे मंदिर एक हजार वर्षांहून अधिक काळ समान अवस्थेत राहील, असे सांगितले. मंदिरासाठी राजस्थानातून शिला आणण्यात आल्या आहेत. मंदिराच्या टिकावूपणा दोनशे फूट खोल खोदकाम करीत मातीची चाचणी घेण्यात आली, असे म्हणाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com