राम मंदिर : पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम अ‌सा
देश-विदेश

राम मंदिर : पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम अ‌सा

१२.४० राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम

jitendra zavar

jitendra zavar

अयोध्या Ayodhya

राम जन्मभूमीचा कित्येक वर्षांपासूनच्या लढ्याचा बुधवारी शेवट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या राम मंदिर भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामजन्मभूमी परिसरातील भूमिपूजनानंतर (Bhumi Pujan) अयोध्येतून देशाला संबोधित करतील. रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवतही जनतेला संबोधन करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास तीन तास अयोध्या दौऱ्यावर असतील. यामध्ये मंदिराचं दर्शन, पूजा अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.

असा असेल पंतप्रधानांचा कार्यक्रम

५ ऑगस्ट सकाळी ९,३५ वाजता दिल्लीतून प्रस्थान

१०.३५ वाजता लखनौ विमानतळावर लँडिंग

१०.४० वाजता अयोध्येसाठी हेलिकॉप्टरमधून प्रस्थान

११.३० वाजता अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लँडिंग

११.४० हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा

१२.०० राम जन्मभूमी परिसरात पोहोचण्याचा कार्यक्रम

१२,१५ वाजता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम

१२.३० वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम

१२.४० राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम

१४.०५ वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडसाठी प्रस्थान

१४.२० वाजता लखनौसाठी प्रस्थान

इक्बाल अन्सारी येणार

मंदिर ट्रस्टकडून सर्वप्रथन इक्बाल अन्सारी यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. ते सर्वोच्च न्यायालयात बाबरी मशिदीकडून पक्षकार होते. इक्बाल अन्सारी हे भूमिपूजनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागतंही करतील. अशोक सिंघल यांच्या कुटुंबीयांनादेखील या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह काही नेते या कार्यक्रमाला येणार नाही. त्यांच्यासाठी व्हि़डिओ कॉन्फरन्सिंगचीही व्यवस्था केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com