धक्कादायक! कोविड रुग्णालयाला भीषण आग; ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू

मृतांची संख्या वाढण्याची भीती
धक्कादायक! कोविड रुग्णालयाला भीषण आग; ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू

दिल्ली | Delhi

करोनाचा कहर (coronavirus crisis) जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल १८ कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत.

इराकची(Iraq) राजधानी बगदाद (Baghdad) मध्ये एका कोविड रुग्णालयाला (Covid Hospital) आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भीषण आगीत ५२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची महती मिळत आहे. तसेच तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. रुग्णालयाच्या करोना वार्डमध्ये ही मोठी आग लागली. या वार्डमध्ये करोना रुग्ण उपचार घेत होते. तेथेच ही आग लागली आहे.

दक्षिणी बगदादमधील अल हुसैन रुग्णालयात ही घटना घडली असून या आगीनंतर मोठा भडका उडाल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू झाला असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे बोलले जात असले तरी या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्यात आलेली नाही. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या घटनेची पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी (Prime Minister Mustafa al-Kadhimi) यांनी गंभीर दखल घेतली. पंतप्रधानांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. अल हुसैन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे आदेश पंतप्रधान कदीमी यांनी या बैठकीत दिले.

यापूर्वीही एप्रिलमध्ये बगदादमधील एका रुग्णालयात आग लागली होती. या घटनेत ८२ रुग्ण होरपळून मरण पावले होते. तर ११० जण जखमी झाले होते. इराकमधील आरोग्य विभाग मोठ्या कठीण काळातून जात असतानाच आगीची ही दुसरी मोठी घटना घडली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com