
दिल्ली | Delhi
इंडोनेशियामधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर (Indonesia Football Match) हिंसाचार उसळला. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२७ लोकांचा मृत्यू झाला. तसेच १०० हून अधिक जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. या सामन्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी फुटबॉल स्टेडियममध्ये पोहोचून हल्ला केला. त्यामुळे झालेल्या हिंसाचारात अनेकजण मृत्युमुखी पडले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे.