केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि खासदार लॉकेट चॅटर्जी
केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि खासदार लॉकेट चॅटर्जी

भाजपाची चार राज्यांमध्ये दिग्गजांना उमेदवारी

बाबुल सुप्रियो, लॉकेट चॅटर्जी, अशोक लाहिरींचा समावेश

नवी दिल्ली -

भाजपाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम येथील विधानसभा निवडणूकीसाठी रविवारी दिग्गज उमेदवारांची दुसरी

यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये केंद्रीय मंत्री आणि खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाचे सरचिटणीस अरुणसिंह यांनी पत्रपरिषदेत उमेदवारांची यादी घोषित केली.

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हे देखील निवडणूक लढणार आहेत. त्यांना टॉलिगंज येथून उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे, बंगालमध्ये भाजपाने आतापर्यंत चार खासदारांना रिंगणात उतरविले आहे. अभिनेते यशदास गुप्ता यांना चंडीतलातून, खासदार लॉकेट चॅटर्जी यांना चुरचुरा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, केंद्र सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी हे अलिपूरदौर मतदारसंघातून लढणार आहेत.

केरळातही भाजपाने दिग्गजांनाच उमेदवारी दिली आहे. मेट्रोमॅन ई. श्रीधरन् यांना पलक्कड मतदारसंघाचे आणि माजी केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोंस यांना कांजिरापल्ली मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे. तामिळनाडूत अभिनेत्री खुशबू सुंदर यांना थाऊझंड लाईट मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा महिला शाखेच्या प्रमुख वनथी श्रीनिवासन् यांना कोईम्बतूर दक्षिणमधून उतरविण्यात आले असून, त्या अभिनेते कमल हासन यांच्याविरोधात लढणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com