Photo : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले

Photo : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी आसाम हादरले

अनेक ठिकाणी पडझड, इमारतींना तडे

दिल्ली (Delhi)

पूर्वेकडील काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. बुधवारी सकाळी ७.५१ वाजण्याच्या सुमारास रिश्टर स्केलवर ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने आसाम आणि उत्तर बंगालच्या काही भाग हादरला आहे.

या भूकंपाचा केंद्रबिंदू आसामच्या सोनितपूर भागात असल्याचं समजतंय. तर गुवाहाटीमध्ये भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल होती. आसामच्या मुख्यमंत्री सोनभद्र सोनवाल हे सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता.

पहिल्या तीव्र झटक्यानंतर नंतर लागोपाठ दोन हादरे जाणवले. एक ७ वाजून ५५ मिनिटाला तर त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा. भूकंपाच्या या धक्क्यांची तीव्रता पहिल्या धक्क्याच्या तुलनेत कमी होती. ७ वाजून ५५ बसलेला झटका ४.३ रिश्टर स्केल, तर दुसरा ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com