नवी दिल्ली -

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली राजस्थानच्या जोधपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अधात्मिक गुरु

आसाराम बापूची प्रकृती अचानक खालावली आहे. कारागृह प्रशासनाने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले मात्र त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने महात्मा गांधी रुग्णालयामधून माथुर रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

आसाराम बापूला तुरूंगात मंगळवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. आसारामला रक्त दाबाचा त्रास असून त श्वास घेण्यास अडथळा येत होता. तसेच त्याच्या छातीतही वेदना होत होत्या. त्यामुळे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.