अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री करोना संक्रमित

स्वतः ट्विटद्वारे दिली माहिती
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री करोना संक्रमित

नवी दिल्ली -

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मी करोना तपासणीसाठी

आरटी-पीसीआर टेस्ट करून घेतल्यानंतर माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी लक्षणविरहीत व तंदुरुस्त आहे. तरी एसओपीनुसार आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, मी स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी एसओपीचे पालन करावे. असे त्यांनी ट्विटद्वारे आवाहन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com