दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 'झूम' श्वानाला लष्कराची श्रद्धांजली

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 'झूम' श्वानाला लष्कराची श्रद्धांजली

दिल्ली | Delhi

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा शूर कुत्रा 'झूम' गंभीर जखमी झाला होता. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी मारले गेले, तर अनेक जवान जखमी झाले.

दक्षिण काश्‍मीर जिल्ह्यातील तंगपावा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने सोमवारी आपला प्रशिक्षित श्वान 'झूम' याला शोध मोहिमेसाठी सोबत घेतले. दहशतवादी लपलेल्या घराला घेरले आणि शोध मोहिमेसाठी पाठवले. मात्र, कारवाईदरम्यान कुत्र्याला दोन गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला होता.

झूमला लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 'झूम' वर शस्त्रक्रिया झाली पण डॉक्टरांना त्याला वाचवण्यात यश आले नाही. दहशतवाद्यांशी निकराने लढा देणार्‍या 'झूम' ला लष्करी अधिकार्‍याकडून पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com