
नवी दिल्ली | New Delhi
आंध्र प्रदेश मधील काकीनाडा, येथे पाच दिवसांसाठी भारतातील तिन्ही सेना दलांचा द्विवार्षिक संयुक्त सराव 'अॅॅम्फेक्स-2023' (Amphex-2023) आयोजित करण्यात आला होता. सेना दलातील विविध पैलूंमध्ये परस्परसंवाद आणि आंतरकार्यक्षमता वृद्धिंगत व्हावी हे 'अॅॅम्फेक्स' या संयुक्त प्रशिक्षणाचे (joint training) उद्दिष्ट समोर ठेऊन हा सराव करण्यात आला.
आतापर्यंत घेतलेल्या अॅॅम्फेक्स सरावांपैकी सर्वात मोठा 'अॅॅम्फेक्स-2023' हा संयुक्त सराव यावर्षी प्रथमच काकिनाडा येथे घेण्यात आला. पाच दिवस सुरु असलेल्या या सरावात सहभागी झालेल्या दलांनी विविध प्रकारच्या जटील कसरतींमध्ये भाग घेतला.
या संयुक्त सरावाचा आढावा AVSM, NM, चीफ ऑफ स्टाफ, ईस्टर्न नेव्हल कमांड व्हाइस अॅॅडमिरल संजय वात्सायन, यांनी भारतीय नौदल आणि भारतीय लष्कराच्या फोर्स कमांडर्सच्या उपस्थितीत घेतला.
या सरावात भारतीय नौदलाच्या मोठ्या प्लॅटफॉर्म डॉक (LPD), लँडिंग शिप्स आणि लँडिंग क्राफ्ट्स, मरीन कमांडोज (MARCOS), हेलिकॉप्टर आणि विमानांचा समावेश असलेल्या अनेक जहाजांचा सहभाग होता. भारतीय सैन्याने विशेष दले, तोफखाना आणि चिलखती वाहनांचा समावेश असलेल्या 900 हून अधिक तुकड्यांनी यामध्ये भाग घेतला. जग्वार लढाऊ विमाने आणि भारतीय हवाई दलाची सी 130 विमानेही सहभागी झाली होती.
अॅॅम्फेक्स-2023 (Amphex-2023) मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या यशस्वी प्रात्यक्षिकांमुळे सैन्याचे जमीन, जल आणि आकाश या तिन्ही क्षेत्रातील प्रभुत्व दिसून आले. याशिवाय अशा प्रकारच्या संयुक्त परीचालनाचा संपूर्ण कार्यभार हाती घेण्यासाठी तिन्ही सेवांमध्ये असलेला उत्कृष्ट समन्वय दिसून आला.