दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी

प्रदूषण रोखण्यासाठी निर्णय
दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी

दिल्ली (Delhi)

गेल्या काही वर्षांपासून दिल्लीला मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा (Delhi Air Pollution) सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind kejriwal) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील दिल्लीत दिवाळीत (Diwali) फटाक्यांवर बंद (Firecrackers Banned In Delhi) घालण्यात आली आहे. गेल्यावर्षी दिवाळीत झालेलं वायू प्रदूषण पाहता यावर्षी आधीच केजरीवाल सरकराने फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षी दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, 'गेल्या तीन वर्षांपासीन दिवाळीच्या काळात दिल्लीत प्रदुषणाची धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यापार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री, साठा आणि वापर करण्यावर पूर्ण बंदी घालण्यात येत आहे. यामुळे लोकांचे जीव वाचवता येतील.' तसेच केजरीवाल यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केलं की, 'गेल्या वर्षी व्यापाऱ्यांकडून फटाक्यांच्या साठ्यानंतर प्रदुषणाचे गांभीर्य पाहून बंदी घातली. त्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान झालं होतं. आता सर्व व्यापाऱ्यांना आवाहन आहे की राज्यात पूर्ण बंदी असल्यानं कोणत्याही प्रकारे साठा करू नये.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com