...यांची जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती
देश-विदेश

...यांची जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती

काल संध्याकाळी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी राजीनामा दिला.

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

काल संध्याकाळी जम्मू - कश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला. आज सकाळी मनोज सिन्हा यांची जम्मू - कश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून घोषणा करण्यात आली.

मनोज सिन्हा हे उत्तर प्रदेशातील भाजपाचे मोठा चेहरा व तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहे पण २०१९ मधील लोकसभेच्या निवडणूकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अगोदर ते रेल्वे तसेच माहिती प्रसारण राज्यमंत्री होते. उत्तर प्रदेशात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता, तेव्हा मनोज सिन्हा हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे होते पण भाजपच्या वतीने योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com