नवी दिल्ली -

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही,

असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत गेल्या 22 दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान गुरुवारी पहाटे शेतकरी आंदोलनातील एका शेतकर्याचा मृत्यू झाला आहे.

पंजाबच्या या 37 वर्षीय शेतकर्याला 10, 12 आणि 14 वर्षांची तीन मुलं आहेत. शेतकर्यांनी केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आतापर्यंत जवळपास 20 आंदोलक शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे.