Viral Video: प्रेयसीचा ड्रामा, रागाच्याभरात चढली थेट १५० फुट टॉवरवर; पुढे घडलं असं काही..

Viral Video: प्रेयसीचा ड्रामा, रागाच्याभरात चढली थेट १५० फुट टॉवरवर; पुढे घडलं असं काही..

छत्तीसगढ | Chattisgarh

सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या माध्यमातून जगातल्या विविध घटना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. यातून आपल्याला वेगवेगळ्या घटना माहिती होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण प्रेयसी आपल्या प्रियकरावर नाराज झाल्यामुळे टॉवरवर (Young Women Climed the Tower) चढली आहे.

छत्तीसगडमधील (Chattisgarh)एका गावात प्रियकर-प्रेयसीचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्रियकरावर चिडलेली प्रेयसी सुमारे १५० फूट उंच खांबावर चढली. कहर म्हणजे तिचे मन वळविण्यासाठी प्रियकरही खांबावर चढला.

Viral Video: प्रेयसीचा ड्रामा, रागाच्याभरात चढली थेट १५० फुट टॉवरवर; पुढे घडलं असं काही..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन योजने’चं लोकार्पण; महाराष्ट्रातील 'या' रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट

अनिता भैना ही नवापूर गावातील महिला दोन दिवसांपासून कोडगर गावात मुकेश भैना याच्या घरी राहात होती. गुरुवारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि चिडून अनिता घराबाहेरील विजेच्या टॉवरवर चढली. मुकेश तिच्या मागे धावला, थांबविण्याचा प्रयत्नही केला; पण काही उपयोग झाला नाही.

या टॉवरची उंची पाहून आपणही थक्क व्हाल. तर या प्रेयसीला मनवण्यासाठी पुन्हा प्रियकरही टॉवरवर चढला आणि काही काळानंतर ते दोघेही परत आल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, हे प्रेमीयुगुल जवळपास अर्ध्या तासांपर्यंत या टॉवरवर होते. त्यानंतर हे दोघेही खाली आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चोकशी सुरू केली आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com