ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा | Sriharikota

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Indian Space Research Organisation - ISRO) पुन्हा एकदा नवा इतिहास रचला.

ISRO ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ३६ उपग्रह वाहून नेणारे भारतातील सर्वात मोठे LVM3 Rocket प्रक्षेपित केले आहे. रविवारी (२६ मार्च) सकाळी ९ वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले.

ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण
महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!

४३ मीटर उंच इस्रोच्या रॉकेटनं ब्रिटनच्या एका कंपनीच्या ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केलं. LVM3 ने ज्या उपग्रहांसह उड्डाण केलं त्यांचं एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मोहिमेला LVM3-M3/OneWeb India-2 असं नाव देण्यात आलं आहे. इस्रोनं ट्वीट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती.

LVM3 हे इस्रोचं सर्वात वजनदार प्रक्षेपण यान आहे ज्यानं चांद्रयान-२ मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी उड्डाणं पूर्ण केली आहेत. खरं तर, ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीनं ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडशी करार केला होता.

ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण
३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव

दरम्यान, ३६ उपग्रहांची पहिली तुकडी २३ ऑक्टोबर २०२२ रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा रॉकेट बंदरातून LVM3 रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आली होती, जी पूर्वी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल Mk3 (GSLV Mk3) म्हणून ओळखली जात होती.

ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण
शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल

वनवेबचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने OneWeb सोबत दोन टप्प्यात ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रक्षेपण शुल्कासाठी करार केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com