Tokyo Olympics : नीरज चोप्राला आनंद महिंद्रांकडून XUV700 भेट

Tokyo Olympics : नीरज चोप्राला आनंद महिंद्रांकडून XUV700 भेट

मुंबई | mumbai

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने (Mahindra & Mahindra) नीरज चोप्राला (Neeraj Chopra) XUV700 SUV गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक (Gold medal) मिळवून दिले आहे.

नेमबाज अभिनव बिंद्रानंतर (Abhinav Bindra) वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. त्यामुळे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नीरजला ही गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. येत्या आठवड्यात महिंद्रा कंपनी आपली फ्लॅगशिप XUV700 SUV गाडी लॉन्च करणार आहे. या गाडीची किंमत साधारण १३ ते २० लाखांदरम्यान असणार आहे.

Tokyo Olympics : नीरज चोप्राला आनंद महिंद्रांकडून XUV700 भेट
Tokyo Olympics : शेतकऱ्याचा मुलगा ठरला सर्वांसाठी आदर्श; जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास...

यापूर्वीदेखील आनंद महिंद्रा यांनी रिओ ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu) आणि साक्षी मलिक (Sakshi Malik) यांना महिंद्रा थार भेट दिली होती.

तसेच मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), टी. नटराजन (T. Natarajan), शुबमन गिल (Shubman Gill), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांनादेखील उत्तम कामगिरीसाठी त्यांनी थार गाडी भेट दिली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com