
ग्वाल्हेर | Gwalior
दोन दिवसांपूर्वी दिल्ली आणि परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला होता, त्यानंतर आता मध्यप्रदेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथं आज सकाळी १० वाजून ३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ग्वाल्हेरच्या आग्नेय दिशेला २८ किमीवर या भूकंपाचं केंद्र होतं. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.