सीमेवरील कुंपणाचे काम 2022 पर्यंत पूर्ण होणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती
सीमेवरील कुंपणाचे काम 2022 पर्यंत पूर्ण होणार

नवी दिल्ली / New Delhi - भारताच्या शेजारील देशांशी असलेल्या सीमेवर तारेचे कुंपण घालण्याचे काम सुरु असून 2022 पर्यंत सर्व सीमा या बंदिस्त करण्यात येतील अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी दिली आहे. ते बीएसएफच्या (BSF) 18 व्या शौर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या बीएसएफच्या जवानांच्या कार्याला अमित शाह यांनी सलाम केला.

केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणार्‍या सर्व जवानांना मी सलाम करतो. हे जवान सीमेवर सजग असून सुरक्षा करत असल्याने आपण सुखाने जगत असतो. त्यांच्यामुळेच आजही भारतात लोकशाही नांदत आहे आणि तिचा विकास होत आहे. त्यांच्या या बलिदानाला कधीही विसरु शकत नाही. बीएसएफच्या आणि इतर पॅरामिलिटरीच्या या लोकांनी देशासाठी बलिदान दिल्याने आज भारताने जागतिक नकाशावर एक गौरवमय स्थान निर्माण केलं आहे.

सीमा सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा आहे. आपल्या समोर अनेक अडचणी आहेत, पण मला आपल्या पॅरामिलिटरी जवानांवर पूर्ण विश्‍वास आहे. घुसखोरी, मानवी तस्करी, हत्यारांची तस्करी, ड्रोन हल्ला असे अनेक आव्हानं आपल्या समोर आहेत. पण या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com