कलम ३७० हटविल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर दौऱ्यावर
File Photo

कलम ३७० हटविल्यानंतर अमित शहा पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

दिल्ली | Delhi

काश्मिरातील ३७० कलम ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) जम्मू- काश्मिरला (jammu-kashmir) भेट देणार आहेत.

अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. अमित शहा यांच्या दौऱ्याला श्रीनगरपासून (Shrinagar) सुरुवात होणार आहे. मागच्या काही आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी निर्दोष, निष्पाप नागरिकांची हत्या केली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी अत्यंत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या भेटीत गृहमंत्री अमित शहा काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांसह स्थानिक सामाजिक संस्था आणि व्यापारी संघटनांना भेटतील आणि काश्मीरच्या विकासावर चर्चा करतील.

असा आहे अमित शहांचा दौरा

उधमपूर आणि हंदवारा येथे मेडिकल कॉलेजांची पायाभरणी

श्रीनगर-शारजा विमान सेवेचे उद्घाटन

रविवार २४ ऑक्टोबर २०२१ रोजी जम्मू शहरात एक सभा घेतील

जम्मूतील आयआयटी विभागाचे उद्घाटन

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com