Crime News : धक्कादायक! भररस्त्यात अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

Crime News : धक्कादायक! भररस्त्यात अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

दिल्ली | Delhi

दिल्लीमध्ये (Delhi) अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यामध्ये गोळ्या झाडून हत्या (Amazon Manager Killed In Delhi) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अ‍ॅमेझॉनचा मॅनेजर त्याच्या मामासोबत दुचाकीवरुन जात होता. त्याचवेळी ५ जणांनी त्यांची दुचाकी रस्त्यात अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. डोक्यात गोळी लागल्याने अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मामा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भजनपुरामधील सुभाष विहार परिसरात राहणाऱ्या हरप्रीतची (३६) अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. रुग्णालयात दाखल करायच्या आधीच त्यानं प्राण सोडला. हरप्रीत ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनमध्ये सीनियर मॅनेजर होता. गोळीबार झाला त्यावेळी चुलत भाऊ गोविंद सिंह हरप्रीत सोबत होता. त्याच्यावर लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन तपासाला प्रारंभ केला आहे.

मंगळवारी रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी सुभाष विहारमध्ये ही घटना घडली. या घटनेची माहिती रात्री ११ वाजून ५३ मिनिटांनी पोलिसांना समजली. हरप्रीत आणि गोविंद बाईकवरुन जात होते. तेव्हा एका स्कूटर आणि बाईकवरुन पाच जण तिथे आले. त्यांनी हरप्रीत आणि गोविंदला रोखलं. मारेकऱ्यांनी गोळीबार केला आणि तिथून पळून गेले. हरप्रीतच्या डोक्याला गोळी लागली. त्याला जग प्रवेश चंद्र रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं. गोविंददेखील गोळीबारात जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com