Afghanistan : काबुल विमानतळावर भारतीयांचं अपहरण नाट्य; वाचा, नेमकं काय घडलय?

Afghanistan : काबुल विमानतळावर भारतीयांचं अपहरण नाट्य; वाचा, नेमकं काय घडलय?

दिल्ली | Delhi

अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यापासून तालिबानने (Taliban) तिथे थैमान घातले आहे. तालिबानचे अत्याचार वाढत चालले आहेत. सर्वच देशांनी आपापल्या देशवासीयांना वाचवण्यासाठीची खटपट सुरु केली आहे.

या सगळ्या भीषण परिस्थितीमध्येच एक धक्कादायक बातमी समोर आली ती म्हणजे साधारण १५० नागरिकांना काबूल विमानतळाबाहेर तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याची आणि अपहरण झालेल्या नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याची. मात्र आता या बातमीमागचं सत्यही समोर आलं आहे.

दरम्यान तालिबानचे प्रवक्ते अहमदल्लाह वासेक यांनी अपहरणाचे वृत्त फेटाळून लावले आहे. काबुल विमानतळावरुन आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नाही. आम्ही दुसऱ्या गेट ने १५० भारतीयांना सुरक्षित एअरपोर्टवर पोहचवलं, असा तालिबाने दावा केला आहे. तसेच भारताने आपला दुतावाज काबुलमध्ये सुरू ठेवावा असे तालिबानी संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले होते. सध्या एक हजारांहून अधिक भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत. भारतासोबतचे संबंध आम्ही सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. भारताच्या दुतावासालाही आम्ही संरक्षण देऊ असे स्पष्टीकरण तालिबानी संघटनांकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com