महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू; शिष्य आनंद गिरीला अटक

संजय राऊतांनी केली 'ही' मागणी
महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू; शिष्य आनंद गिरीला अटक

दिल्ली | Delhi

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे (Akhil bharatiya Akhada parishad) अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज (Narendra Giri Maharaj) यांचा सोमवारी प्रयागराज (Prayagraj) येथे संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची ‘हत्या की आत्महत्या’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांना (Police) घटनास्थळी सुसाईड नोट (Sucide Note) सापडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी (Mahanat Narendra Giri) यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. मठातील लोकांना त्यांची खोली आतून बंद असल्याची आढळली, त्यानंतर दार उघडले असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांबाला लटकलेला आढळला. दरम्यान, नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांच्या निधनाच्या वृत्ताने अयोध्येत शोककळा पसरली आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची माहिती पसरताच घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. पोलीस प्रत्येक अँगलने प्रकरणाचा तपास करणार आहेत.

दरम्यान घटना स्थळावरून सापडलेल्या सुसाईड नोटवरुन (Sucide note) पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटक केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील (Akhada Parishad) संपत्तीचा वाद समोर आल्याने या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावं, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय चौकशी करावी - संजय राऊत

दरम्यान महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri) यांच्या संशयास्पद मृत्युची सीबीआय (CBI) चौकशी करावी अशी मागणी शिवसेना (Shiv Sena) पक्षाने केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांचे आशीर्वाद शिवसेनेला अनेकदा मिळाले आहेत. आम्ही अनेकदा त्यांना भेटलो आहे. त्यांचे व्यक्तिमत्व पाहता ते आत्महत्या करतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्या यावी. नरेंद्र गिरी यांचा मृत्य पाहता उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात हिंदुत्त्वाचा गळा घोटला जातो आहे की काय असेच आम्हाला क्षणभर वाटते, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे. ते दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Related Stories

No stories found.