
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र आणि जिओचे प्रमुख आकाश अंबानी (Akash Ambani) यांचे नाव प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने (Time Magazine) प्रसिद्ध केलेल्या जगातल्या उदयाला येत असलेल्या ताऱ्यांमध्ये समाविष्ट झाले आहे...
Time100 Next या 100 जणांच्या यादीत आकाश अंबानी यांचा समावेश झाला आहे. या यादीत समाविष्ट झालेले आकाश अंबानी एकमेव भारतीय उद्योगपती आहेत.
याव्यतिरिक्त आम्रपाली गण या जन्माने भारतीय असलेल्या अमेरिकन बिझनेस लीडरचाही या यादीत समावेश आहे. अमेरिकी गायक SZA, अभिनेत्री सिडनी स्विनी, बास्केटबॉलपटू जा मोरंट, स्पॅनिस टेनिसपटू कार्लोस अल्काराझ, अभिनेता आणि टीव्ही पर्सनॅलिटी केके पामर, पर्यावरणविषयक कार्यकर्ती फार्विझा फरहान आदींचाही या यादीत समावेश आहे.