कोझिकोडे
कोझिकोडे
देश-विदेश

कोझिकोडे येथे एअर इंडियाच विमान कोसळलं

एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

नवी दिल्ली | New Delhi

केरळ राज्यातील कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर एअर इंडिया कंपनीच्या IX-1344 या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान विमानतळावर लँड होताना हे विमान घसरून अपघात झाला आहे. घटनास्थळी राष्ट्रीय अपत्ती निवारण दल पोहोचले असून, मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जात आहे. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

हे विमान दुबईहून कोझिकोड येथे येत होते. सायंकाळी पावणे पाच वाजता दुबईहून विमानाने उड्डाण केले होते. या विमानात जवळजवळ १९१ प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com