
दिल्ली | Delhi
अबुधाबी (Abu Dhabi) हून कालिकत (Calicut) ला जाणाऱ्या इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे (Air India Express Flight) अबुधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले आहे.
उड्डाण केल्यानंतर हवेत फक्त १ हजार फूट उंचीवर गेल्यानंतर विमानाच्या इंजिनला आग लागली. त्यानंतर विमानाचे अबू धाबी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले गेले.
विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'अबू धाबीहून कालिकतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट १ इंजिनला आग लागल्यानंतर परत आले, विमानाने अबू धाबी विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या विमानात एकूण १८४ प्रवासी होते.
दरम्यान, दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दिल्लीच्या IGI विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. या विमानात १४० प्रवासी होते.