स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठा कट उघडकीस, तब्बल २ हजार जिवंत काडतूस जप्त

स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठा कट उघडकीस, तब्बल २ हजार जिवंत काडतूस जप्त

दिल्ली | Delhi

स्वातंत्र्य दिनापूर्वी दिल्ली पोलिसांनी एक मोठा कट उधळून लावला आहे. शस्त्रास्त्र आणि दारूगोळा तस्करीत सहभागी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून तब्बल २००० जिवंत काडतुस जप्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस कसे आणि कुठून आले? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

आरोपींचा हेतू काय होता आणि ही काडतूसे कोणी पाठवली होती याबाबत पोलीस तपास सुरू करत आहेत. मात्र, स्वातंत्र्यदिनाच्या तीन दिवसआधी हा शस्त्रसाठा आढळून आल्याने घातपाताची शक्यता नाकारता येत नाहीये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com