भावी डॉक्टरांसाठी आनंदाची बातमी! नीट परीक्षेची वयोमर्यादा हटवली

भावी डॉक्टरांसाठी आनंदाची बातमी! नीट परीक्षेची वयोमर्यादा हटवली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वैद्यकीय शिक्षण (Medical education) घेऊ इच्छिणाऱ्या अर्थात डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगला निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) दिली आहे. नीट परीक्षेसाठी (Neet Exam) कमाल वयोमर्यादेची अट हटविण्यात आली आहे....

वैद्यकीय शिक्षणासाठीची पात्रता ठरवण्यासाठी बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना नीट ही परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण व्हावी लागते. मेरिटनुसार त्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. मात्र, आतापर्यंत या परीक्षेसाठी (Exam) वयाची अट होती.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने पदवीधर वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत होणाऱ्या या परीक्षेला बसण्यासाठी उच्च वयोमर्यादा संपविली आहे. या निर्णयामुळे आता कोणत्याही विद्यार्थ्याला डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मात्र, कमाल वयोमर्यादा वाढल्याने नीट परीक्षार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून त्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने 'एनटीए'ला (NTA) कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

सामान्य वर्गासाठी २५ तर राखीवसाठी होती. ३० ची अट राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा सामान्य वर्गासाठी २५ वर्षांची तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी ३० वर्षे वयाची अट होती. मात्र, राष्ट्रीय आरोग्य विज्ञान आयोगाने ही वयोमर्यादा शिथिल केल्याने आता डॉक्टर होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी वाढत्या वयाचा अडसर निर्माण होणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com