करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर...; अभ्यासातून ‘ही’ नवी माहिती आली समोर

करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर...; अभ्यासातून ‘ही’ नवी माहिती आली समोर

नवी दिल्ली - देशातील करोना लसीकरणाने 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 25 कोटींहून अधिक करोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतात सध्या कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक-व्ही या तीन लसी देण्यात येत आहेत. दरम्यान, एक महत्वाची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज 77 टक्क्यांनी तर प्रकृती गंभीर होऊन आयसीयूमध्ये दाखल केले जाण्याचे प्रमाण 94 टक्क्यांनी कमी होते, अशी माहिती तमिळनाडूतील वेल्लोर येथील सीएमसी महाविद्यालयाने Christian Medical College, Vellore केलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे. सीएमसी महाविद्यालयाने अभ्यासासाठी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विविध रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिकांसह इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या प्रकृतीची तपासणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com