सामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलसह घरगुती LPG सिलेंडरच्या दरात वाढ

सामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलसह घरगुती LPG सिलेंडरच्या दरात वाढ

दिल्ली l Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार (Unemployed) झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel price hike) होत आहे.

दरम्यान, सरकारने पेट्रोल-डिझेलसह (petrol-disel) घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर (LPG cylinders hiked) पुन्हा एकदा वाढवले आहेत. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमती आज पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भारतातील प्रमुख शहरातील दर

- दिल्लीत ८९९.५० रुपये

- कोलकातामध्ये ९२६ रुपये

- मुंबईत ८९९.५० रुपये

- चेन्नईत ९१५.५० रुपये

तसेच पेट्रोलच्या किंमती ३० पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमती ३५ पैशांनी दिल्ली मध्ये वाढल्या आहेत. मुंबई मध्येही पेट्रोलचे दर आज २९ पैशांनी तर डिझेलचे दर आज ३७ पैशांनी वाढले आहेत. आज मुंबई मध्ये पेट्रोलची किंमत प्रती लीटर १०८.९६ रुपये आहे. तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर म्हणजेच ९९.१७ प्रति लीटर आहे. मेट्रो सिटीमध्ये इंधनाचे हे सर्वाधिक दर आहेत.

भारतातील प्रमुख शहरातील इंधन दर

मुंबई - १०८.९६ (पेट्रोल), ९९.१७ (डिझेल)

दिल्ली - १०२.६४ (पेट्रोल),९१.४२ (डिझेल)

चैन्नई - १००.४९ (पेट्रोल), ९५.९३ (डिझेल)

कोलकाता - १०३.६५ (पेट्रोल), ९४.५३ (डिझेल)

Related Stories

No stories found.