अफगाणिस्तानाचे माजी मंत्री करताय डिलिव्हरी बॉयचं काम; फोटो व्हायरल

अफगाणिस्तानाचे माजी मंत्री करताय डिलिव्हरी बॉयचं काम; फोटो व्हायरल

दिल्ली | Delhi

अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानने (Taliban) काबीज केल्यावर सामान्य नागरिकच काय सत्तेच्या शिखरावर बसलेल्या राजनेत्यांना ही देश सोडून जाण्यास भाग पाडले आहे. या मध्ये अफगाणिस्तानचे माजी मंत्री सय्यद अहमद शाह सादत (Afghanistan Ex It Minister Sayed Ahmad Shah Saadat) यांचाही समावेश आहे.

सादत हे सध्या जर्मनीत (Germany) आश्रय घेत आहेत. सादत यांनी जर्मनीत राहण्याची व्यवस्था केली पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना काहीतरी काम करणे भाग आहे त्यामुळे ते सध्या असे काही काम करत आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

सय्यद अहमद शाह सादत पिझ्झा डिलिव्हरीचे (Pizza Delivery Boy) काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीच्या लिपझिग (Leipzig) शहरात सायकलवर पिझ्झा वाटप करत आहेत. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले. नंतर ते अफगाणिस्तान सोडून जर्मनीत आले.

एका वृत्त वहिनीला माहिती देतांना ते म्हणाले की, त्यांनी गेल्या वर्षीच आयटी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यात आणि राष्ट्रपती गनी यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. राजीनामा दिल्यानंतर ते काही काळ देशात राहिले, परंतु नंतर जर्मनीला आले. सुरुवातीला सर्व काही ठीक झाले, पण पैशाअभावी त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनण्याचा निर्णय घेतला. डिलिव्हरीचे काम करण्यात लाज नाही, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com