Afghanistan Crisis : १६८ जणांना घेऊन IAF चं विमान भारतात दाखल

Afghanistan Crisis : १६८ जणांना घेऊन IAF चं विमान भारतात दाखल

दिल्ली | Delhi

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अशाच अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं (Indian Air Force) हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे.

भारतीय हवाई दलाचे C-17 (Indian Air Force) विमान आज सकाळी अफगाणिस्तानच्या काबुलमधून (Kabul Airport) उड्डाण करीत गाझीयाबादच्या हिंडन हवाई तळावर (Hindon IAF base in Ghaziabad)उतरले आहे. या विमानात १६८ प्रवासी होते, यात १०७ भारतीय नागरिक आहेत तर काही अफगाण नागरिक आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दरम्यान अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंग खालसा (Afghanistan MP Narender Singh Khalsa) हे भारतीय हवाई दलाच्या विमानातून भारतात आले आहे. विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांना रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. आम्ही २० वर्षात जे उभं केलंय, ते आता शून्य झाल्याचं ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com