अभिनेता सोनू सूद करोना पॉझिटिव्ह

अभिनेता सोनू सूद करोना पॉझिटिव्ह

मुंबई -

गेल्यावर्षी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांना स्वखर्चाने स्वगृही पोहचवले. त्याच्या चांगल्या कार्यामुळे रिअल लाईफ हिरो झालेला अभिनेता म्हणजे सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: त्याने इंस्टाग्रामवर दिली आहे.

सोनू सूदने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे,

नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ असेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत.. मी तुमच्यासोबत आहे.

दरम्यान, सोनू सूद लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com