<p><strong>मुंबई - </strong></p><p>अभिनेता सोनू सूद याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती हे समजू </p>.<p>शकलं नाही. दरम्यान, मुंबई महापालिकेने निवासी इमारतीत अवैध हॉटेल सुरु केल्याच्या आरोप सोनू सूदवर केला असून हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे या प्रकरणामुळेच तर सोनू सूदने शरद पवार यांची भेट घेतली नाही ना? अशी चर्चा सुरु आहे.</p>