कालीचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवले; कडक कारवाई होणार

कालीचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवले; कडक कारवाई होणार

रायपूर | Raipur

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी संत कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी धर्म संसदेत अपशब्दांचा वापर केला. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे...

२६ डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटले. सत्ताधारी पक्षातील अनेकांनी महाराजांवर राष्ट्राद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

नवाब मलिक म्हणाले की, कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींना शिवीगाळ केली आहे. ही घटना राज्याबाहेरील असली तरी महाराज अकोल्यातील आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक करावी. या मागणीचे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनीही समर्थन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहाला कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. या घटनेची माहिती घेवून संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान टिकरापारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अकोला (Akola) येथून येथे आलेल्या कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांच्या भाषणात समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या विधानांचादेखील समावेश होता.

महात्मा गांधींबाबत अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी खालच्या दर्जाचे शब्द वापरले आहेत. कालीचरण महाराजांच्या विधानामुळे बराच बाद पेटला आहे. कालीचरण महाराज हे केवळ गांधीजींना शिविगाळ करून थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com