
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
झेमा, उत्तर सिक्कीम येथे लष्कराच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे....
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराची तीन वाहने जवानांना घेऊन जात होती. हा ताफा चाटणहून थांगूच्या दिशेने निघाला होता.
झेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत कोसळले. यात १६ जवानांचा मृत्यू झाला.