दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

CCTV कॅमेरा आणि सिक्योरिटी बॅरियरची तोडफोड
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

दिल्ली | Delhi

दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विट केले की, काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर हल्ला केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) आणि सुरक्षा भिंती तोडल्या आहेत. याशिवाय गेटवरील बूम बॅरिअर्सही तुटले आहेत. भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराची तोडफोड केली, असा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे. तसेच एवढेच नाही तर भाजप पोलिसांनी त्यांना थांबवण्याऐवजी दारात आणले, असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com