महापौर निवडणुकीत AAP ने मारली बाजी, 'या' आहे नव्या महापौर

महापौर निवडणुकीत AAP ने मारली बाजी, 'या' आहे नव्या महापौर

दिल्ली | Delhi

अनेक दिवसांच्या गोंधळानंतर आज अखेर दिल्ली महानगरपालिका म्हणजेच एमसीडीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शांतेत पार पडली. यात आम आदमी पक्षाच्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या आहेत. शेली ओबेरॉय या दिल्लीच्या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक ८६ मधील नगरसेवक आहेत.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. दिल्लीतील महापालिकांच्या पुनर्रचनेनंतर दिल्ली महापालिकेची निवडणूक जाहीर झाली होती. त्या निवडणुकीत आपनं भाजपला पराभवाचा धक्का दिला होता. आपनं भाजपच्या ताब्यात असलेली दिल्ली महापालिका खेचून आणली होती. मात्र, महापौर पदाची निवडणूक गेल्या काही महिन्यांपासून वारंवार लांबणीवर पडत होती.

अखेर दिल्ली महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. सुप्रीम कोर्टानं महापालिका निवडणुकीत उपराज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या नगरसेवकांना मतदान करता येणार नाही, असा आदेश दिला होता. आज झालेल्या निवडणुकीत आपच्या शैली ऑबेरॉय या विजयी झाल्या आहेत. तर, भाजपच्या रेखा गुप्ता यांचा पराभव झाला आहे.

शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली. महापौर म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. शैली ओबेरॉय यांनी आपण सभागृह संविधानानुसार चालवू असं आश्वासन दिलं. आपण सर्व सभागृहाची गरिमा राखून काम करु, अशी मला आशा असल्याचं ओबेरॉय म्हणाल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com