
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
एका शालेय विद्यार्थ्याचा वाढदिवसाच्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. १६ वर्षीय विद्यार्थ्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी मृतदेहाजवळ केक कापून त्याला श्रद्धांजली वाहिली. हैदराबाद येथे ही घटना घडली...
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत मुलाचे नाव सचिन आहे. दहावीत शिकणारा सचिन वाढदिवस साजरा करण्यासाठी आसिफाबाद शहरात खरेदीसाठी गेला होता. बाजारात त्याला छातीत दुखू लागल्याने तो खाली कोसळला.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती अधिक बिघडली. त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला. त्याच्या आईवडिलांनी वाढदिवसाचा केक त्याच्या मृतदेहाजवळ कापून त्याला श्रद्धांजली वाहिली.