क्रिकेट सामन्याच्या तिकीट विक्रीदरम्यान चेंगराचेंगरी

क्रिकेट सामन्याच्या तिकीट विक्रीदरम्यान चेंगराचेंगरी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 25 सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे तिसरा T20 सामना खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Cricket Stadium) हा सामना होणार आहे...

या सामन्याचे तिकिट खरेदी करण्यासाठी हैदराबादमधील जिमखाना मैदानावर आज क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे मोठी चेंगराचेंगरी झाली होती. या चेंगराचेंगरीत चार जण जखमी झाले आहेत.

हैदराबादच्या जिमखाना मैदानावर तिकीट खरेदीसाठी क्रिकेट फॅन्सने मोठी गर्दी केली होती.तिकीट काढण्यासाठी चाहत्यांची लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. प्रचंड जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या चेंगराचेंगरीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com