गर्भवती महिलेने सावत्र मुलीला ठेवले पेटीत कोंडून

गर्भवती महिलेने सावत्र मुलीला ठेवले पेटीत कोंडून

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) मुजफ्फरनगरमधून (Muzaffarnagar) एक धक्कादायक वृत्त हाती येत आहे. महिलेने आपल्या ९ वर्षीय सावत्र मुलीला एका पेटीत कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

या महिलेविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पी असे या महिलेचे नाव आहे. ही महिला गर्भवती असल्याने तिला अद्याप अटक केली नसल्याची माहिती मिळत आहे.

गर्भवती महिलेने सावत्र मुलीला ठेवले पेटीत कोंडून
पती-पत्नीचे भांडण, मेव्हणी आली मदतीसाठी धावून अन् पुढे घडले असे काही...

मुलगी सोमवारपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या घरी जात तपासणी केली. तेव्हा पोलिसांना ती एका पेटीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्या आईने तिला पेटीतून कोंडून ठेवले, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com