नवी दिल्ली -

ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवा प्रकार आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणार्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा

जास्त धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. या नव्या स्ट्रेनची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. हा नवीन स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.

त्यामुळे तिथे लॉकडाउन अधिक कडक करण्यात आला आहे. या नव्या स्ट्रेनच्या धोक्यामुळे जगातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि ब्रिटनहून येणार्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. नेदरलँड आणि बेल्जिअमनं ब्रिटनमध्ये जाणार्या आपल्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. इटलीदेखील विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात आहे.

भारत सतर्क

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतातही काही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्याची मागणी केली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे जगाच्याबरोबरीने भारताची देखील चिंता वाढवली आहे. कारण आधीच करोना व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे.

या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी, सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नाही असे म्हटले आहे.