
रांची | Ranchi
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झारखंड सरकारने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने झारखंड jharkhand मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत करोनाच्या coronavirus 'संसर्गजन्य रोग कायदा 2020' संमत करण्यात आला आहे.
या कायद्या अंतर्गत राज्यभरात नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच मास्क mask न वापरल्यास एक लाख रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच दोन वर्षाच्या कारावासाची तरतूद देखील या कायद्यात करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सुद्धा राज्यातील अनेक लोक विना मास्क मुक्त संचार करताना आढळले होते. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती एका हिंदी वृत्त वाहिनीने दिली आहे.
सध्या झारखंडमध्ये करोना बाधितांची संख्या 6458 असून 64 लोकांचा यात मृत्यु झाला आहे.