जलविद्युत प्रकल्पातील आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू

तेलंगणातील श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातील घटना
जलविद्युत प्रकल्पातील आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू

तेलंगणा । Telangana

गुरुवारी मध्यरात्री तेलंगणातील (Telangana) श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पाच्या पॉवर हाऊसमध्येच भीषण आग लागली होती (srisailam power plant fire). रात्री आगीची घटना कळाल्यानंतर एनडीआरएफच्या (NDRF) तुकडीला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आगीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र यात ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या सीमा (telangana and andhrapradesh boundaries) भागात असलेल्या श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पॉवर हाऊसमध्ये गुरूवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी तिथे १९ कर्मचारी होते. मात्र, ९ कर्मचारी आगीमुळे अडकून पडले. या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. शुक्रवारी दुपारी आधी सहा तर थोड्या वेळानं आणखी तीन जणांचे मृतदेह जवानांना मिळाले. ९ जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.

या घटनेची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM K Chandrashekar Rao) यांनी गंभीर दखल घेतली आहे. के. चंद्रशेखर राव यांनी याचा तपास सीआयडीकडे (CID) देण्याचे आदेश दिले आहे. सीआयडीचे अतिरिक्त संचालक गोविंद सिंह यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही घटना दुर्दैवी आहे. अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करण्यात आले, पण त्यांचा दुःखद अंत झाला.

के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगणा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com