
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन दि. २८ मे रोजी केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या इमारतीचे लोकार्पण करणार आहेत. हा क्षण स्मरणात राहण्यासाठी या दिवशी अर्थ मंत्रालयाकडून विशेष ७५ रुपयांचे नाणे लॉन्च केले जाणार आहे....
असं असेल ७५ रुपयांचं नाण नाणं
मिळालेल्या माहितीनुसार, या नाण्यावर या नवीन संसद भवनाची प्रतिमा सेच त्याचे नावदेखील देण्यात येईल. ७५ रुपयांचे नाणे गोल आकारचे असेल. याचा व्यास ४४ मिलीमिटर आणि काठ २०० सेरेशन असेल. ७५ रुपयांचे हे नाणे चार धातूंपासून बनवले जाईल.
ज्यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकल, आणि ५ टक्के झिंक वापरले जाणार आहे. तसेच यावर नवीन संसद भवन इमारतीखाली २०२३ देखील लिहीलेले असेल.
तर नाण्याच्या समोरच्या बाजूस मध्यभागी अशोक स्तंभावरील सिंह आणि सत्यमेव जयते लिहीलेले असेल. नाण्यावर देवनगरी लिपीत भारत आणि इंग्रजीत इंडिया लिहीलेले असेल. तसेच संसद भवन हे शब्द देखील देवनागरी आणि इंग्रजी भाषेत दिले जातील. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असेल.