करोनाचा फटका ; जीडीपीत 7.3 टक्क्यांची घसरण

करोनाचा फटका ; जीडीपीत 7.3 टक्क्यांची घसरण

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाच्या दुसर्‍या लाटेचा चांगलाचा फटका बसला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षातील जीडीपी आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्यानुसार जीडीपीत 7.3 टक्क्यांची घट झाली आहे. ही चार दशकातील सर्वात मोठी घट आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट 4 टक्के होती. यापूर्वी 1979-80 मध्ये ग्रोथ रेट -5.3 टक्के नोंदवला गेला होता. तेव्हा देशात दुष्काळजन्य स्थिती होती. तसेच कच्च्या तेलाचे भावही दुप्पट झाले होते.

आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीत जीडीपी 4 टक्के होता. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात 8 टक्के जीडीपी घसरेल असा अंदाज बांधला होता. मात्र 2020-21 या वर्षात जीडीपी 7.3 टक्क्यांनी घट नोंदवली गेली. चौथ्या तिमाहीत ग्रोथ रेट 1.6 टक्के नोंदवला गेला. मागच्या वर्षी मार्च महिन्यात करोनाची पहिली लाट आली होती. तेव्हा अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं होतं. 2020-21 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन तिमाहीत भारताचा जीडीपी निगेव्हटी ग्रोथ दाखवत होता. मात्र चौथ्या तिमाहीत जीडीपी 1.6 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला थोडासा दिलासा मिळाला आहे.

जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध केली जाते. जीड़ीपीसाठी देशातील उत्पादन आणि सेवांचा विचार केला जातो. कृषी, उद्योग आणि सेवा या क्षेत्रात उत्पादन घटलं कींवा वाढलं यावर सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो. जीडीपीवर देशाच्या आर्थिक विकासाची गणितं बांधली जातात. मात्र लॉकडाउन आणि वाढत्या करोना रुग्णांमुळे त्याचा प्रभाव या क्षेत्रांवर पडला. दुसरीकडे, चीनमध्ये जानेवारी-मार्च 2021 या तिमाहीत 18.3 टक्क्यांनी जीडीपी वाढला आहे.

एप्रिल 2021 या महिन्यात एकूण 1 लाख 41 हजार 384 लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. या जीएसटीत केंद्राचा 27,837 कोटी, राज्याचा 35,621 कोटी, एकीकृत जीएसटी 68,481 कोटी आहे. त्यात उपकर 9,445 कोटींचा आहे. मागच्या मार्च महिन्यात 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com