सुरक्षा दलांना मोठे यश! जैश-ए-मोहम्मदच्या ६ दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांना मोठे यश! जैश-ए-मोहम्मदच्या ६ दहशतवाद्यांचा खात्मा
file photo

दिल्ली | Delhi

जम्मू कश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये कुलगाम (Kulgam) आणि अनंतनाग (Anantnag) मध्ये ६ दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा करण्यामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे.

कुलगाम (Kulgam) आणि अनंतनाग (Anantnag) मध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ही कारवाई सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठं यश आहे. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

या दोन्ही चकमकीत एकूण ६ दहशतवादी आणि दोन पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याचवेळी, यापूर्वी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून एक एम-4 आणि दोन एके-47 रायफलही जप्त करण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com